Past Continuous Tense ( अपूर्ण भूतकाळ )

Past Continuous Tense
( अपूर्ण भूतकाळ )
It was happening. ( ते घडत होतं.)मागील काळात म्हणजेच भूतकाळात घडत असलेल्या घटना व्यक्त करण्यासाठी वापर.क्रिया चालू होती/होत्या असा अर्थ.ती घटना अगदी एका मिनिटापूर्वीही घडत होती तरीही.मराठीत क्रियापदाच्या शेवटी - त होता/होते अशी अक्षरे येतात.उदा.खात होता/होते (was/were eating)
जात होता/होते (was/were going)
येत होता/होते (was/were coming),
करत होता/होते (was/were doing).
लक्षात ठेवाः
अपूर्ण भूतकाळात नेहमीच मुख्य क्रियापदाच्या 1ल्या रूपाचे ing रुप वापरले जाते.उदा. eat + ing = eating
Catch - पकडणे was/were catching - पकडत होता/होते.
Cry - रडणे         was/were crying - रडत होता/होते.
Read - वाचणे     was/were reading - वाचत होता/होते.
Tell - सांगणे       was/were telling - सांगत होता/होते.
Promise -         was/were promising वचन होता/
वचन देणे                                                       होते.
 I,He,She,It,Ram,Sima,Fan = was, We,You,They,Boys,cars= were
 मुक्रिचे 1ले रुप eat + ing = eating = खात.
was/were eating = खात होता/होते.
I was eating an apple.             We were eating apples.
मी सफरचंद खात होताे.               आम्ही सफरचंद खात होतो.
You were eating an apple.      It (Caw)was eating grass.
तू सफरचंद खात होता.                 ती( गाय ) गवत खात होती.
They were eating bananas.   The bus was coming.
ते  केळी खात होते.                             बस येत होती.
नकार :
was/were + not + eating = खात नव्हता/नव्हते. नव्हता म्हणजेच नाही होता/होते. was not =  wasn't, were not = weren't
I wasn't eating an apple.         We weren't eating apples.
मी सफरचंद खात नव्हतो.                  आम्ही सफरचंद खात नव्हतो.
You weren't eating an apple. It(Caw) wasn't eating grass.
तू सफरचंद खात नव्हता.                   ती( गाय ) गवत खात नव्हती
They weren't eating bananas.   The bus wasn't coming.
ते  केळी खात नव्हते.                           बस येत नव्हती.
लक्षात घ्या.क्रिया चालू नव्हती.
प्रश्न :
प्रश्न: प्रश्न बनवताना was/wereअगोदर वापरतात.
Was I /He/She/It..?,Were We/You,They...? असा वापर
               Positive Verbal Questions
Was I shouting ? मी ओरडत होतो का?
Were we playing?आम्ही खेळत होतो का?
Was he telling? तो सांगत होता का?
              Negetive Verbal Questions
Weren't they going? ते जात नव्हते का?
Wasn't he telling? तो सांगत नव्हता का?
या प्रश्नांची उत्तरे Yes,I was/No,I wasn't अशी देतात.
Wh Questions :
What was I doing ?
मी काय करत होताे ?   
Who wasn't going?         
कोण जात नव्हता ?
How much money were you spending?
तु किती पैसे खर्च करत होता?
Why wasn't he writing?
तो का लिहित नव्हता?
I was swimming in the river.मी नदीत पोहत होतो.
Were you reading ? तू वाचत होता का?
Who was watching TV? TV कोण पाहत होतं?
Raju was watching TV.He was dancing. तो नाचत होता.
Who was'nt reading? कोण वाचत नव्हता?
I was getting late. मला उशिर होत होता.
Were you teaching ? तू शिकवत होता का?
We were brushing our teeth. आम्ही दात घासत होतो.
I was taking a bath.मी अंघोळ करत होतो.
He was studying.तो अभ्यास करत होता.
Why were you running ? तू का धावत होता ?

Comments

Popular posts from this blog

How to use Simple futureTense ( साधा भविष्यकाळ )

How to use Simple Past Tense साधा भूतकाळ

How to use Present Continuous Tense.